Photography
ला बहुतेक जण छायाचित्रण म्हणतात परंतु मी प्रकाशचित्रण म्हणणे पसंत
करतो. आपण ज्या व्यक्तीची किंवा वस्तूची प्रतिमा घेतो,
त्यावरून परावर्तित होणार प्रकाश आपण कॅमेरात पकडत असतो. आणि आजच्या डिजिटल प्रकाशचित्रणाच्या काळात ISO नावाचा एक
प्रकार असतो तो कॅमेराच्या सेन्सरवर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता दर्शवतो. म्हणून
या कलेला प्रकाशचित्रण संबोधणे मला जास्त योग्य वाटतो.
तर मी हा प्रकाशचित्रणाचा उद्योग, लेखनाचा उद्योग चालू करायच्या कितीतरी आधी चालू केला होता. दहावी नंतरच्या सुट्टीत पुण्याच्या सुप्रसिद्ध दाते फोटो स्टुडिओचे मालक श्री दाते यांच्याकडून काही सूचना आणि सल्ले घेतले होते. तेव्हा Magic Eye नावाचा एक साधा box camera वापरला होता.
रीळवाल्या कॅमेरावर प्रकाशचित्रण
या मॅजिक आय कॅमेराच्या आधी बाबांचा Agfa Click III नावाचा असाच एक Fixed Focus Camera होता.
आग्फा क्लीक ३ कॅमेरा |
या दोन्ही कॅमेरात
रिळे अर्थात roll असतात
ज्यावर प्रकाशचित्र उमटते. आग्फा क्लीक ३ मध्ये १२
प्रकाशचित्रे घेता येतील असे रीळ बसते तर मॅजिक आयमध्ये ३६ प्रकाशचित्रे घेता
येतील असे रीळ बसते. या आग्फा क्लीक ३ वर निव्वळ कृष्ण
धवल अर्थात black and white प्रकाशचित्रे घेता येतात तर
मॅजिक आयवर रंगीत आणि कृष्ण धवल, दोन्ही प्रकारची रीळे
वापरता येतात. म्हणजे, एकावेळी या दोन पैकी एकाच प्रकारचे
रीळ घालता येते यात! तर श्री दाते यांच्याकडे मी शिकलो तेव्हा या मॅजिक आयमध्ये कृष्ण धवल प्रकारचे रीळ भरले होते.
त्याआधी या आग्फा क्लीक ३ वर प्रकाशचित्रे घेणे बाबांकडून शिकलो होतो. या कॅमेराचे वरचे चित्र पाहिलेत तर एक गोष्ट लक्षात येईल की भिंगाजवळ दोन कळा (buttons) आहेत त्यातली गोल कळ आहे टी खाली दाबून कॅमेराची झडप अर्थात shutter उघडून रिळावर प्रकाश पडतो तर दुसरी कळ वर खाली करून भिंगापुढचे छिद्र अर्थात aperture लहान मोठे करता येते.
आग्फा क्लीक ३ कॅमेराची अंतर्गत रचना |
या
कॅमेराच्या उजव्या कप्प्यात रीळ भरून ते डाव्या बाजूला ओढून एका खाचेत अडकवायचे
आणि दार बंद करायचे असते. वरचे गोल चक्र फिरवून रीळ पुढे
ढकलता येते. रिळाच्या मागच्या बाजूला असलेल्या लाल
काचे समोर त्या प्रकाशचित्राचा क्रमांक येईपर्यंत वरचे गोल चक्र फिरवावे लागते. हा
क्रमांक बरोबर त्या लाल काचे समोर आला तरच पूर्ण प्रकाशचित्र उमटते. हा क्रमांक
लाल काचेच्या पुढे गेला तर परत मागे घेण्याची सोय नाहीये. म्हणून हे चक्र
काळजीपूर्वक फिरवावे लागते. आणि हे चक्र नाही फिरवले तर एका प्रकाशचित्रावर दुसरे
प्रकाशचित्र उमटते म्हणजेच double exposure होते.
त्यामुळे हा कॅमेरा काळजीपूर्वक वापरावा लागतो. याच्या एका रीळावर साधारणपणे ५० मि
मि X ५० मि मि आकाराची बारा प्रकाशचित्रे घेता येतात. हा
कॅमेरा वापरून बाबांनी माझी आणि माझ्या मोठ्या बहिणीची काही मस्त प्रकाशचित्रे
काढली आहेत.
आग्फा क्लिक ३ कॅमेरावर बाबांनी काढलेले प्रकाशचित्र |
हा
कॅमेरा वापरून मी स्वतः फार प्रकाशचित्रण केल्याचं माझ्या स्मरणात नाही पण मॅजिक
आय कॅमेरा वापरून मी रंगीत आणि कृष्ण धवल, दोन्ही
प्रकारची प्रकाशचित्रे काढली आहेत. श्री दाते यांच्या निरीक्षणाखाली काढलेल्या
कृष्ण धवल प्रकाशचित्रांपैकी पुण्यातील विठ्ठलवाडी परिसरातले एक प्रकाशचित्र मला आणि श्री दाते यांना खूप
आवडले होते, तिथून खऱ्या अर्थाने मी प्रकाशचित्रण सुरू केले
असे म्हणता येईल.
मॅजिक आय हा एक Fixed Focus Camera आहे. म्हणजे याच्या लेन्सची फोकल लेंथ बदलता येत नाही. जवळच्या किंवा लांबच्या वस्तूंची एकसारखीच प्रकाशचित्रे घेतो हा! या कॅमेरात रीळ भरणे आणि प्रकाशचित्र काढून झाल्यावर रीळ पुढे ढकलणे आग्फा क्लीक ३ कॅमेरापेक्षा जरा सोपे आहे. एक प्रकाशचित्र काढून झाल्यानतंर उजवीकडचे दातेरी चक्र फिरवले की रीळ पुढे सरकते आणि पुढच्या प्रकाशचित्राची जागा भिंगासमोर आली की हे दातेरी चक्र फिरायचे थांबते. त्यामुळे double exposure किंवा half exposure हे प्रकार आग्फा क्लीक ३ कॅमेरात होतात ते यात होत नाहीत.
मॅजिक आय कॅमेराचे controls |
वरच्या उजवीकडच्या
छोट्या खिडकीत ३६ पैकी किती प्रकाशचित्रे घेऊन झाली आहेत तो क्रमांक दिसतो. वरची
गोल चकचकीत कळ दाबली की कॅमेराची झडप उघडून रिळावर प्रकाश पडतो. Flash वापरण्यासाठी त्याला बाहेर सरकवावा
लागते. मग तो charge झाला की Flash Ready हा दिवा लागतो.
मॅजिक आय कॅमेरा |
या
कॅमेरालाही भिंगापुढचे छिद्र लहान मोठे करायची सोय आहे. या चित्रात दिसतोय तो weather
switch वर खाली करून छिद्र लहान मोठे करता येते.
सगळी ३६ प्रकाशचित्रे काढन झाली की दातेरी चक्र पुढे जात नाही आणि रीळही पुढे सरकत नाही. मग ते मागे घेण्यासाठी वरचे काळे गोल चक्र, दातेरी चक्र फिरवतो त्याच्या विरुद्ध दिशेने फिरवावे लागते. वरच्या छोट्या खिडकीत "शून्य" आकडा दिसला म्हणजे सगळे रीळ परत मागे आले आहे हे कळते. असे होण्या आधी कॅमेराचे दार उघडले तर रिळावर बाहेरचा प्रकाश पडून घेतलेली सर्व प्रकाशचित्रे वाया जातात. या कॅमेराला फक्त flash चालवण्यासाठी विद्युत पुरवठा लागतो तो दोन battery cell द्वारे मिळतॊ.
मॅजिक आय कॅमेराची अंतर्गत रचना |
हा
कॅमेरा वापरून भरपूर प्रकाशचित्रे काढली आहेत. त्यापैकी माझे सर्वात आवडते
प्रकाशचित्र हे आहे.
मॅजिक आय कॅमेरावरचे प्रकाशचित्र |
यांच्या
काही वर्षांनंतर Olympus Superzoom 105G हा कॅमेरा घेतला.
या कॅमेरातही ३६ प्रकाशचित्रे घेता येतील असे रीळ बसते. आधीच्या दोन कॅमेरापेक्षा Olympus
मधली वेगळी गोष्ट म्हणजे याला Zoom Lens आहे
म्हणजे या भिंगाची Focal Length कमीत कमी ३८ मि मि ते
जास्तीत जास्त १०५ मि मि एवढी आहे त्यामुळे लांबच्या आणि जवळच्या गोष्टींचीही चांगली प्रकाशचित्रे घेतो हा कॅमेरा.
ऑलिम्पस सुपर झूम १०५ जी कॅमेरा |
याच्या
भिंगाचे झाकण (रिळावर प्रकाश पाडणारी झडप नव्हे) बाजूला सरकवले की ते बाहेर येते
आणि हा कॅमेरा प्रकाशचित्रे घेण्यासाठी तयार असतो.
ऑलिम्पस सुपर झूम १०५ जी कॅमेरा |
या
कॅमेरातले रीळ एक प्रकाशचित्र काढले की स्वयंचलित प्रकारे पुढे सरकते. याचा मोठा
फायदा हा की double exposure किंवा half
exposure हे प्रकार होत नाहीत आणि सगळी ३६ प्रकाशचित्रे काढून
झाली की सगळे रीळ परत स्वयंचलित प्रकारे मागे येते
आणि सुरक्षितरित्या बाहेर काढता येते. या कॅमेराच्या मागच्या बाजूला T आणि W अशी buttons आहेत
जी वापरून हवे तसे zoom करता येते, अर्थात focal lengthच्या मर्यादेत राहूनच!
वरचा LCD screen ३६ पैकी कितवे प्रकाशचित्र चालू आहे,
flash वापरला जातोय का नाही या गोष्टी दाखवतो. तसेच याला self
timerही आहे जो वापरून उपस्थित सर्वांचे प्रकाशचित्र काढता येते.
ऑलिम्पस सुपर झूम १०५ जी कॅमेराने काढलेली प्रकाशचित्रे |
ऑलिम्पस सुपर झूम १०५ जी कॅमेराने काढलेली प्रकाशचित्रे |
हा कॅमेरा
वापरून भरपूर प्रकाशचित्रण केले होते. पूर्वोत्तर भारताची एक संस्मरणीय सहल या
कॅमेरात कैद केली होती.
नमामि ब्रम्हपुत्र: तेजपूर येथील ब्रम्हपुत्रा नदीवरील ३ कि मि लांब पूल |
या
तिन्ही कॅमेरातली एक सामान गोष्ट म्हणजे कॅमेराच्या भिंगाला जे दृष्य दिसते, जी रिळावर उमटणार आहे, तेच दृष्य प्रकाशचित्रकाराला
दिसत नाही. कारण या तिन्ही कॅमेराचे दृष्य शोधक अर्थात view finders वेगळ्या जागी आहेत
आणि रिळाचा भिंगासमोर येणारा भाग वेगळ्या जागी! यामुळे या फरकाची सवय होईपर्यंत
प्रकाशचित्राचा अपेक्षित परिणाम साधला जात नाही. flash चालवणे,
रीळ पुढे मागे करणे आणि zoom या
सर्व गोष्टींसाठी कॅमेराला विद्युत पुरवठा लागतो तो एका battery cell
द्वारे पुरवला जातो.
डिजिटल कॅमेरावर प्रकाशचित्रण
यानंतर बऱ्याच
काळाने मी Sony Cyber Shot
H 50 हा digital camera घेतला आणि प्रकाशचित्रणाचे एक मोठे क्षेत्र खुले झाले.
तुमच्या कॅमेराच्या memory cardची क्षमता ही प्रकाशचित्रे घेण्याची मर्यादा असते digital photographyमध्ये, बारा किंवा छत्तीस ही नाही! या कॅमेराने काढलेली खुपसारी प्रकाशचित्रे समाज माध्यमांवर
आहेत. हा कॅमेरा वापरून ७ वर्षांत जवळजवळ दहा हजार प्रकाशचित्रे काढली आहेत, तीही जास्तीकरून या कॅमेराच्या Auto Mode वरच कारण aperture, shutter speed, ISO या सुवर्ण त्रिकोणाशी ओळख व्हायला जरा वेळ लागला.
सोनी कॅमेरा |
दिल्ली आग्रा सहलीत खूप उपयोग केला या कॅमेराचा.
सोनी कॅमेराने काढलेले सर्वात आवडते प्रकाशचित्र |
निकॉन SLR कॅमेरा |
मध्य प्रदेशातील सहलीची हजारपेक्षा जास्त अविस्मरणीय प्रकाशचित्रे कैद केली आहेत यात.
नर्मदा नदीतून दिसणारा महेश्वरचा घाट |
प्रदर्शनात मांडलेले माझे प्रकाशचित्र |
तेव्हा
लवकरच एखाद्या छानशा photo story सह भेटू!
दिवस दोनशे शहात्तरावा पान दोनशे शहात्तरावे.
मुलुंड मुंबई
No comments:
Post a Comment